Wednesday 16 May 2018

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांचे साकीनाक्यात झाले सार्वजनिक अभिनंदन

कौटुंबिक सदस्य आणि नातेवाईक यांची उपस्थिती तसेच साकीनाका विभागातील सामान्य नागरिक आणि स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी भरभरून दिलेल्या आर्शिवादाने साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांच्या सार्वजनिक अभिनंदन सोहळयाला वेगळीच झळाळी मिळाली.

साकीनाका येथील चक्र हॉटेलात साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांच्यासाठी पंचशील महिला मंडळ, अथक सेवा संघ, काजूपाडा विकास मंच आणि पंचशील निर्मित सेवा सहकारी संस्था तर्फे आयोजित सार्वजनिक अभिनंदन सोहळयात प्रचंड गर्दीने व्याप्त सभागृहाने त्रिलोकी प्रसाद आणि मंडळीने गझल आणि गाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. इंडिया न्युज वनचे जुबेर खान यांनी अविनाश धर्माधिकारी यांच्या कामगिरी बाबत 22 मिनिटांची शॉर्ट फिल्म बनविली होती ती दाखविण्यात आली. गेल्या 3 वर्षात एक पोलीस अधिकारी या नात्याने सर्वोत्तम कामगिरी बजावत सर्वच पातळीवर साकीनाका पोलीस स्टेशनचे नाव उंचाविणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते सार्वजनिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत हुले, कांतीलाल धुमाळ, रमेश भालेकर आणि संतोष जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी 73 सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींनी अविनाश धर्माधिकारी यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी बोलताना अविनाश धर्माधिकारी यांनी सार्वजनिक अभिनंदन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानत याचे श्रेय साकीनाका पोलिसांना दिले. टीम वर्क असल्याचे सांगत ते म्हणाले की 3 वर्षांपूर्वी जेव्हा चार्ज घेतला तेव्हापासून आजमितीपर्यंत सामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुरावा दूर करत सर्वांना एकत्र आणत सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. साकीनाका पोलीस हद्दीत अपहरण, खून, चोरी, बलात्कार, दरोडा सारख्या नोंदणीकृत गुन्ह्यात शत-प्रतिशत यश मिळवित आरोपींना पकडण्यात टीमला यश प्राप्त झाले. 

आयोजक सुभाष गायकवाड, मनाली गायकवाड, दिनेश मधुकुंटा, संतोष त्रिपाठी, दिनेश सिंह, राम साहू, फरीद खान, अशोक सिंह, बलवंत कुबळ यांच्यासोबत गोल्ड मेडलिस्ट माधुरी गोणबरे, शुभ्रांशु दीक्षित, रवि नायर, देव शेट्टी, अफझल खान, डॉ जेनेट हेंड्रिक, सिस्टर बिबयाना, मोहम्मद अब्दुल कय्युम, इष्टदेव त्रिपाठी, अखिलेश तिवारी, देवदत्त भट्ट (बालासाहेब), बाबू बतेली, कैलास आगवणे, गुलशन खान, अफरोज शेख, प्रदीप विश्वकर्मा, पांडुरंग शेटके, किशोर ढमाल, सुनील यादव, एड वीरेंद्र दुबे, वजीर चांद मुल्ला, सुरेंद्र यादव, बाबा गायकवाड, अशोक पोळ, राजू मालुसरे, एड राजेश दाभोळकर, कुणाल संगोई, काका पावणकर, जगन्नाथ उदूगडे, अनिल उदूगडे, दिनेश पाल, रत्नाकर शेट्टी,  बाळू मस्के, अवधूत शेलार, पांडुरंग पांगीरे, विनेश ढोले, प्रदीप बंड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment