Friday 14 July 2017

मुंबई विद्यापीठातील एफएम रेडिओ सेवा बंद

23 लाख रुपये खर्च करुन मुंबई विद्यापीठात बसविलेल्या एफएम रेडिओ सेवेवर प्रत्येक वर्षांला 12 लाखांचा खर्च होत असून सद्या ती पूर्णपणे बंद असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे मुंबई विद्यापीठातील एफएम रेडिओ सेवाबाबत माहिती विचारली होती. वर्ष 2003-04 मध्ये तत्कालीन सिनेट सदस्य डॉ अमरजीतसिंह मनहास, प्रशांत पाटील, समीर देसाई आणि तुषार जगताप यांच्या सुचनेनंतर मुंबई विद्यापीठाने मुंबई विद्यापीठात एफएम रेडिओ सेवा सुरु करण्यास वर्ष 2006 रोजी मान्यता दिली होती. या सेवेचे समन्यवक नीरज हाटेकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की सद्या एफएम रेडिओ सेवा बंद आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा सिंह पाटील यांनी 8 फेब्रुवारी 2008 रोजी एफएम रेडिओ सेवेचे उद्धटान केले होते. त्यावेळी रेडिओ स्टेशनसाठी 25 लाखांची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात 22,80,798/- इतकीच रक्कम उपकरण आणि स्टेशन बसविण्यासाठी खर्च झाली होती. या एफएम रेडिओ स्टेशनसाठीवार्षिक बजट 12 लाख रुपये असून प्रत्यक्षात 12 लाखांहून कमी रक्कम खर्च होते, त्याची माहिती जमा केल्यानंतर पाठविण्यात येण्याचे गलगली यांस कळविण्यात आले आहे. सेवा बंद असल्याबाबत  हाटेकर यांनी सांगितले की नवीन ट्रान्समीटरची आवश्यकता असून गेल्या 11 वर्षांपासून वापरण्यात आलेला ट्रान्समीटर बदलण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. परीक्षेचा निकाल असो किंवा एफएम रेडिओ सेवा, मुंबई विद्यापीठ प्रत्येक कामात अपयशी ठरले असल्याची टीका अनिल गलगली यांनी केली.

No comments:

Post a Comment