Monday 22 May 2017

मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात चक्क हळदी कुंकू कार्यक्रम आणि श्री सत्यनारायणाची पूजा

मुंबई विद्यापीठात असलेले दीक्षांत सभागृहाचा नावलौकिक आणि प्रतिष्ठा आगळीवेगळी असल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वृद्धिगंत करण्यासाठी येथेच कार्यक्रम करण्याचा प्रत्येकांचा प्रयत्न असतो. मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरु डॉ संजय देशमुख यांच्या लहरी स्वभावाचा फटका दीक्षांत सभागृह बसला असून भाडयाने देण्याच्या प्रक्रियेत मोठा घोळ तर आहेच तर गेल्या 16 महिन्यात 61 आयोजनापैकी 23 वेळा दीक्षांत सभागृह निःशुल्क वितरित केल्यामुळे आर्थिक फटका मुंबई विद्यापीठास सोसावा लागल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रांवरुन होत आहे. हळदी कुंकू कार्यक्रम, वार्षिक बैठक आणि श्री सत्यनारायणाची पूजा सुद्धा दीक्षांत सभागृहात भाडेरहित करण्यास डॉ संजय देशमुख यांनी परवानगी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाने दीक्षांत सभागृह कार्यक्रमासाठी वितरण आणि सभागृहाच्या परिरक्षणावर होणा-या खर्चाची माहिती मागितली होती. डॉ संजय देशमुख यांनी कुलगुरु पद स्वीकारताच  17 महिन्यात 61 कार्यक्रम दीक्षांत सभागृहात संपन्न झाले. यापैकी 23 कार्यक्रमास कुलगुरु या अधिकाराचा वापर करत डॉ संजय देशमुख यांनी दीक्षांत सभागृह चक्क निःशुल्क दिले. दीक्षांत सभागृह कोणास दयावे आणि किती भाडे आकारावे, याचा कोणताही नियम आणि दर निश्चिती नसल्यामुळे आयोजकाचे व्यक्तित्व पाहत 38 पैकी निम्म्याहून अधिक कार्यक्रमास जे भाडे आकारले ते भाडे दीक्षांत सभागृहाची उज्वल परंपरा आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेता नगण्य ठरत आहे. 21 ऑगस्ट 2015 पासून 20 डिसेंबर 2016 या 16 महिन्याच्या कालावधीत मुंबई विद्यापीठाने 61 पैकी फक्त 38 कार्यक्रमास भाडे आकारले असले तरी सर्व कार्यक्रमास वेगवेगळा दर आकारला आहे. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी 10 लाख 82 हजार 150 रुपये शुल्क अदा केले आहे तर 23 कार्यक्रम निःशुल्क संपन्न झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या ठराविक विभागाचा अपवाद वगळता अन्य विभागास भाडे आकारले आहे.

ज्या 23 संस्थेस दीक्षांत सभागृह निःशुल्क देण्याचे काम करण्यात आले आहे त्यात ऑब्जरवर रिसर्च फाउंडेशन, झी 24 तास, सिडेनहैम इंस्टिट्यूट, स्नेहालय, जलसंधारण मंत्री डॉ गिरीष महाजन, सतीश नाईक, जमनलाल बजाज इंस्टिट्यूट, ऑल इंडिया कौंसिल फॉर टेक्निकल इंस्टिट्यूट, समाज कल्याण विभाग के साथ मुंबई विद्यापीठाच्या काही विभागास निःशुल्क दिले.  ज्या 38 संस्थेस दीक्षांत सभागृह भाड्याने दिले त्या शुल्कात कोणताही तारतम्य नाही. यामुळे प्रति महिन्यास 70 हजार रुपयांचा खर्च असलेल्या दीक्षांत सभागृहास 16 महिन्यात 10 लाख 82 हजार 150 हजारांचे भाडे प्राप्त झाले आणि झालेल्या 11 लाख 20 हजाराच्या खर्चाची तुलना केली असता 37,850 रुपयांचे नुकसान झाले आहे. 

अनिल गलगली यांनी डॉ संजय देशमुख यांच्या लहरीपणास दोष देत मुंबई विद्यापीठाचे कुलपती असलेले राज्यपाल यांस लेखी पत्र पाठवून मागणी केली आहे की सर्वप्रथम दीक्षांत सभागृह देण्याचे नियम बनविताना आजूबाजूच्या फोर्ट परिसरात सभागृहासाठी आकारले जाणा-या शुल्काचा अभ्यास करत भाडे निश्चिती करावी आणि काही सामाजिक कार्यक्रम किंवा समाज प्रबोधनासाठी सरसकट सभागृह निःशुल्क न देता कमीत कमी वीज आणि अन्य सुविधांचे शुल्क आकारावे जेणेकरुन मुंबई विद्यापीठास आर्थिक तोटा सोसावा लागणार नाही, अशी मागणी सरतेशेवटी गलगली यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment