Wednesday 3 May 2017

महाराष्ट्रात 2.40 लाख विद्यार्थी घटले, 2912 शिक्षक वाढले

महाराष्ट्रात 2.40 लाख विद्यार्थी घटले, 2912 शिक्षक वाढले

महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा उडाला असून आवश्यक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संख्येत ताळमेळ नसल्याची बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीवरुन समोर आली आहे. दरवर्षी ज्या तुलनेत विद्यार्थ्याच्या संख्येत घट होत आहे त्या तुलनेत शिक्षकांचे समायोजन न झाल्याने हा सावळागोंधळ होत आहे. गेल्या 5 वर्षात 36 जिल्ह्यांत 2.40 लाख इतक्या प्रचंड संख्येने विद्यार्थी घटले आहेत. तर 3 वर्षांत 2912 शिक्षक वाढले आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांस कडे राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्याची आणि शिक्षकांच्या यु-डायस अहवालाची प्रत मागितली होती. यु-डायस अहवालानुसार गेल्या 5 वर्षात पहिली पासून आठवी पर्यंत 2 लाख 40 हजार 31 विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आकडेवारीत फारसा फरक नसून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घटले असतानाही शिक्षक संख्या वाढली आहे. वर्ष 2012-2013 दरम्यान 1,62,26,543 विद्यार्थी होते त्यात 86,27,243 मुले आणि 75,99,300 मुली होत्या. वर्ष 2013-2014 दरम्यान 1,61,58,791 विद्यार्थी होते त्यात 85,94,742 मुले आणि 75,64,049 मुली होत्या. वर्ष 2014-2015 दरम्यान 1,61,72,420 विद्यार्थी होते त्यात 85,96,022 मुले आणि 75,76,398 मुली होत्या. वर्ष 2015-2016 दरम्यान 1,60,44,013 विद्यार्थी होते त्यात 85,24,669 मुले आणि 75,19,344 मुली होत्या. वर्ष 2016-2017 दरम्यान 1,59,85,712 विद्यार्थी होते त्यात 84,95,745 मुले आणि 74,89,967 मुली होत्या. गेल्या 4 वर्षात विद्यार्थ्याच्या तुलनेत शासकीय आणि खाजगी  शाळेतील शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्ष 2013-14 मध्ये एकूण शिक्षक 4,14,752 होते त्यात 2,68,915 शासकीय तर 1,45,837 खाजगी आहेत. वर्ष 2014-15 मध्ये एकूण शिक्षक 4,05,855 होते त्यात 2,58,406 शासकीय तर 1,47,449 खाजगी आहेत. वर्ष 2015-16 मध्ये एकूण शिक्षक 4,06,292 होते त्यात 2,54,785 शासकीय तर 1,51,507 खाजगी आहेत. वर्ष 2016-17 मध्ये एकूण शिक्षक 4,08,767 आहेत त्यात 2,53,513 शासकीय तर 1,55,254 खाजगी आहेत. 

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण सचिव नंदकुमार आणि शिक्षण आयुक्त यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की त्याच वर्षी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यास बिन कामी शिक्षकांस बसविणे बंद होईल त्यासाठी शिक्षण आयुक्त आणि जिल्हा पातळीवर प्रत्येक वर्षीच जून मध्ये समायोजन प्रक्रिया राबवावी तसेच जे शिक्षक समायोजन विरोधात न्यायालयात जातात त्यावर चाप ठेवण्यासाठी न्यायालयात केविट दाखल करावे.

No comments:

Post a Comment