Wednesday 22 February 2017

आमिर खान यांचा दांभिकपणा

फिल्म अभिनेता आमिर खान यांनी मुंबई पालिका निवडणुकीत मुंबई फर्स्ट नावाने जारी केलेल्या जाहिरातीत जनतेस मतदानाचे आवाहन केले पण स्वतः मात्र मतदान केलेच नाही. खानच्या या दांभिकपणावर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रोष व्यक्त केला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आमिर खान सहित मुंबई फर्स्ट आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगास केलेल्या ट्वीटमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे की मतदान का केले नाही. मग इतकी मोठी जाहिरात देण्याचा उद्देश्य काय होता? अनिल गलगली यांनी सदर जाहिरात अप्रत्यक्ष राजकीय होती कारण निवडणूक आयोग याकामी आघाडीवर होता तसेच सामान्य मुंबईकर सुद्धा मतदान टक्क्यात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील होते. अश्यावेळी एक एनजीओ अचानक मतदानादिवशी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर खर्च करते, ही बाब दिसते तेवढी सरळ आणि पारदर्शक नाही, असे सांगत अनिल गलगली यांनी याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

1 comment:

  1. एकदम बरोबर आहे चौकशी तर झालीच पाहिजे पारदर्षकतेच्या नावावर जनतेची दिशाभुल करणार्या नेत्यांनी निष्पक्ष चौकशी करण्याचे धाडस करावे अन्यथा हे पण मतांसाठि एकप्रकारे राजकारण होते याची शक्यता नाकारता येत नाहि व ह्या एनजीओ ला मिळणार्या पैशाच्या स्रोताची चौकशी झालीच पाहिजे.

    ReplyDelete