Wednesday 7 December 2016

प्रत्येक महिन्यास 8.28 लाख रुपये डेंग्यूच्या प्रचारासाठी खर्च करते पालिका

मुंबई शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून यावर जनमानसात जनजागरण करण्यासाठी पालिका प्रत्येक महिन्यास रु 8.28/-  लाख खर्च करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे. मागील 3 वर्षात पालिकेने रु 2.98/- कोटी खर्च केले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडे डेंग्यूची साथ रोखणे आणि जनजागरण करण्यासाठी पालिकेने केलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माहिती शिक्षण आणि संपर्क कक्षाच्या जन माहिती अधिकारी आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ नीलम कदम यांनी अनिल गलगली यांस वर्ष 2013 ते वर्ष 2015 या 3 वर्षात 2 कोटी 98 लाख 21 हजार 995 रुपये आणि 92 पैसे जनजागरणवर खर्च झाल्याची आकडेवारी दिली. यात वर्ष 2013 मध्ये 22 लाख 62 हजार 857 रुपये खर्च झाले. वर्ष 2014 मध्ये 1 कोटी 51 लाख 65 हजार 79 रुपये आणि 78 पैसे तर वर्ष 2015 मध्ये 1 कोटी 23 लाख 94 हजार 59 रुपये आणि 14 पैसे खर्च केले. पालिकेने प्रत्येक महिन्यास 8.28 लाख डेंग्यूच्या प्रचारासाठी खर्च केले आहे. वर्ष 2013 मध्ये 11 डेंग्यू रुग्णांनी प्राण गमावले. वर्ष 2014 मध्ये 12 डेंग्यू रुग्णांनी प्राण गमावले तर  वर्ष 2015 मध्ये  8 रुग्ण डेंग्युच्या साथीने स्व:ताचे प्राण वाचवू शकले नाही. 

अनिल गलगली यांच्या मते पालिकेने इतका प्रचंड पैसा खर्च करुनही जनजागरण मोहीम तोगडी पडली आहे. यावर्षी सुद्धा डेंग्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांस पाठविलेल्या पत्रात अनिल गलगली यांनी मागणी केली आहे की याऐवजी पालिकेने सोशल मीडिया वापर करावा आणि  प्रत्येक रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णाचा मोबाईल नंबरची माहिती संकलित केल्यास अश्या प्रसंगी त्यांस एसएमएस करत घरोघरी जनजागरण होऊ शकते.

No comments:

Post a Comment