Monday 19 December 2016

नोटबंदीच्या दिवशी 2 हजार रुपयांच्या 4.95 लाख कोटींचे चलन आरबीआयकडे छापून तयार होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातून 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली होती त्या दिवशी फक्त 2 हजार रुपयांच्या 4,94,640 कोटींच्या नोटा छापून तयार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांस भारतीय रिजर्व बैंकने दिली आहे. मोदी यांच्या या निर्णयामुळे फक्त सामान्य नागरिकाबरोबर भारतीय रिजर्व बैंकेला सुद्धा  500 आणि 1000 मूल्याच्या 20,51,166.52  कोटी चलनावर पाणी सोडावे लागले. भारतीय रिजर्व बैंकेने त्यांच्याकडे  असलेल्या स्टॉकच्या एक चतुर्थांश चलनाची छपाई केली.

आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी भारतीय रिजर्व बैंकेस नवीन आणि जुन्या नोटांबाबत विविध माहिती विचारली होती. भारतीय रिजर्व बैंकेच्या केंद्रीय जन माहिती अधिकारी पी विजयकुमार यांनी अनिल गलगली यांस कळविले की ज्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा सार्वजनिक केली होती त्यावेळी भारतीय रिजर्व बैंकेकडे नवीन 500 रुपये मूल्यांच्या एक ही चलन नव्हते. नवीन 2000 रुपये मूल्यांची एकूण चलनाची किंमत 24732 कोटी होती आणि त्याची एकूण किंमत 4,94,640 कोटी होती.

याउलट ज्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी केली गेली होती त्यावेळी भारतीय रिजर्व बैंकेकडे 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपये मूल्यांच्या एकूण चलनाची संख्या 12,42,300.1 कोटी होती तर त्याची एकूण किंमत 23,93,753.39 कोटी होती. यात 500 आणि 1000 मूल्यांच्या चलनाची संख्या 3,18,919.2 कोटी होती ज्याची एकूण किंमत  20,51,166.52 कोटी होती. म्हणजे एकूण चलनापैकी 86 टक्के चलन नोटबंदीमुळे रद्द झाले होते. प्रत्यक्षात भारतीय रिजर्व बैंकेने फक्त नवीन 2000 रुपयांच्या मूल्यांच्या 24732 कोटी चलनाची छपाई केली.ज्याची एकूण किंमत 4,94,640 कोटी आहे.

अनिल गलगली यांच्या मते भारतीय रिजर्व बैंकेच्या माहितीच्या आधारे शासनाने इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा अभ्यास केला नाही ना व्यावहारिक दृष्टिकोणातून काम केले कारण सद्या  भारतीय रिजर्व बैंकेकडे चलन होते त्यापैकी 86 टक्के चलन रद्द झाले आणि त्यांच्या पूर्तिसाठी शासनाने 24.11 टक्याच्या फक्त 2000 रुपये मुल्याचे चलन छापले आहे. अनिल गलगली यास अविवेकी निर्णय सांगत भविष्यात अश्याप्रकारच्या आपत्कालीन प्रसंगातून सावरण्याचे आवाहन शासनास केले आहे

1 comment:

  1. रिझर्व्ह बँकेने नंतर जाहीर केलेली माहिती आणि वर माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती, यांच्यात तफावत आहे.

    श्रीपाद कुलकर्णी

    ReplyDelete