Sunday 27 November 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खारघर पीडित कुटुंबियांस भेटले

संपूर्ण देशात गाजलेल्या खारघर येथील डे केअर प्रकरणास जलद न्यायालयात चालविणार आणि याबाबतीत धोरण बनविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पीडित कुटुंबियांस दिले.

नवी मुंबईतील 10 महिन्याच्या बाळाला मारणे, आपटणे आणि लाथाने मारण्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मालक आणि आयास अटक केली. या प्रकाराची तक्रार 10 महिन्याच्या बाळाची आई रुचिता आणि वडील रजत सिन्हा यांनी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सह्याद्रि गेस्ट हाउसमध्ये खारघर प्रकरणात 10 महिन्याच्या मुलीची आई रुचिता सिन्हा यांस भेटले. त्यांच्यासोबत आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली, पंकज जायसवाल, आशीष मजाटिया, रुसित पटेल, योगेश सिंह बरोबर होते. रुचिता सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांस संपूर्ण प्रकरण सविस्तर सांगितले आणि प्रकरणास जलद न्यायालयात चालविण्याची मागणी केली. डे केअरचे मालिक आणि आया यांस कडक शिक्षा करत अश्याप्रकारच्या डे केअर केंद्रावर धोरण बनविण्याची मागणी केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहानभूती दाखवित आश्वासन दिले की आरोपीस सोडले जाणार नाही. या प्रकरणास जलद न्यायालयात घेण्याची आणि नियामक बनविण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयास आवश्यक सूचना देण्याचे आदेश दिले.

No comments:

Post a Comment