Monday 14 November 2016

रीतसर पावती देण्यास सपशेल फेल ठरलेल्या पालिकेने घेतलेला चेक परत दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थ मंत्री अरुण जेटली सर्व व्यवहार चेक किंवा कार्डच्या माध्यमाने करण्याचा अनाहुत सल्ला देत असताना अजूनही अश्या प्रकारे व्यवहार करण्यास यंत्रणा सज्ज नाही. मुंबई महानगरपालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कडून घेतलेला चेक त्यांस रीतसर पावती न देता आल्यामुळे  परत केला आणि सर्वरमधील तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली हे सकाळी घाटकोपर एन वार्ड कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात रु 284/- अदा करण्यास गेले असता रु 500/- ची नोट स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर गलगली यांनी चेक दिला असता तो स्वीकारला पण पावती जनरेट होत नव्हती. जवळपास 40 मिनटानंतर गलगली यांस तो चेक रीतसर पावती न देता आल्यामुळे परत करण्यात आला. पूर्व उपनगरातील सर्वच नागरी सुविधा केंद्रात हाच गोंधळ होता आणि ज्या कंपनीस काम दिले आहे त्या कंपनीचा एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कार्यरत कर्मचारी यांस पैसे अदा करण्यास आलेल्या लोकांस उत्तर देताना दमछाक होत होती. अनिल गलगली यांच्या मते नागरिक चेकने सर्व व्यवहार करतील पण वेळोवेळी अश्या चुकांमुळे वेळ वाया जाईल. देशात सुव्यवस्थित यंत्रणा कार्यान्वित करण्याची अपेक्षा गलगली यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment