Saturday 12 November 2016

विद्यापीठे वा-यांवर, कुलगुरु परदेशी दौ-यांवर

महाराष्ट्रातील विद्यापीठातील विद्यादानाचे काम बाजूला ठेवत सर्वच विद्यापीठातील कुलगुरु देशात कमी परदेशात जास्तच रमत आहे. कुलसचिव या नात्याने राज्यपालांनी 28 अर्जापैकी 27 अर्ज मान्य करत फक्त एकाच प्रकरणात परवानगी नाकारल्याची माहिती राज्यपालांच्या सचिव कार्यालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.विद्यापीठे वा-यांवर सोडत जे कुलगुरु परदेशी दौ-यांवर आघाडीवर आहेत त्यात डॉ संजय देशमुख आणि डॉ गाडे यांनी बाजी मारली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील कुलगुरु यांनी परदेशी दौ-यांची माहिती मागितली असती अवर सचिव प्र.पां. लुबाळ यांनी अर्धवट माहिती दिली. याबाबत अपील सुनावणीत उप सचिव परिमल सिंह यांच्या आदेशानंतर गलगली यांस कळविण्यात आले की गेल्या 3 वर्षात कुलगुरुंच्या परदेशी दौ-यांसाठी एकूण 28 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डब्लू एन गाडे यांचा मास्को(रशिया) हा दौरा वगळून उर्वरित 27 दौ-यांसाठी परवानगी देण्यात आली.
विद्यापीठास वा-यांवर सोडत जे कुलगुरु परदेशी
दौ-यांवर गेले त्यात डॉ संजय देशमुख आणि डॉ डब्लू एन गाडे आघाडीवर असून प्रत्येकांनी 5 परदेशी दौरे केले आहेत. फक्त 10 महिन्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुख यांनी इजरायल, मास्को, चीन, जर्मनी आणि दक्षिण कोरिया या देशांची सफर केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ डब्लू एन गाडे यांनी सुद्धा 5 वेळा परदेशी दौरे केले असून यूएएस, चीन, जर्मनी व स्वीडन, कॅनडा व यूएसए आणि लंडनचा दौरा केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ बी ए चोपडे यांनी 4 परदेशी दौरे केले असून त्यात स्पेन, ढाका, जपान आणि इजरायलचा समावेश आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ के पी विश्वनाथ यांनी फक्त एकच झांबिया व आफ्रिका या देशाचा दौरा केला आहे. जळगाव येथीलनार्थ महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर डॉ एस यू मेश्राम यांनी 4 वेळा न्यूयॉर्क, जपान, मेक्सिको आणि फ्लोरिडा या देशाचा दौरा केला. अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ आर जी दाणी यांनी 2 वेळेला केलेल्या परदेशी दौ-यांत उबेकिस्तान आणि रोमचा समावेश आहे.  कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर डॉ डी बी शिंदे यांनी केलेल्या 2 परदेशी दौ-यांत दक्षिण कोरिया आणि युके फ्रांस व आयर्लंडचा समावेश आहे. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर डॉ एन एन मालदार यांनी कोरिया तर परभणीच्या मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ बी वेंकटेश्वरलू यांनी इजिप्तचा परदेशी दौरा केला आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन विद्यापीठाचे डॉ एम एम साळुंखे यांनी 2 वेळा ढाका आणि मलेशिया या देशाचा दौरा केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डब्लू एन गाडे यांचा मास्को(रशिया) हा दौ-यांस परवानगी 21 ऑक्टोबर 2015 रोजी नाकारली. कुलगुरु यांस वर्षातून एकदाच आणि 5 वर्षात जास्तीत जास्त 20 दिवस परदेशी दौ-यांसाठी जाण्याचा सल्ला कुलपति यांनी दिला होता आणि गाडे यांनी साढे तीन वर्षात 5 दौ-यांत 51 दिवस परदेशी गमन केले होते. अनिल गलगली यांच्या मते विद्यादान करण्याऐवजी कुलगुरु बनताच परदेशी दौ-यांचे चलन वाढले असून डॉ संजय देशमुख यांनी फक्त 10 महिन्यात 5 परदेशी दौरे करण्याचा नवीन विक्रम स्थापित केला असून यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. कुलपति यांनी 50 दिवसांची केलेली वाढ अव्यावहारीक असून यात बदल करत 20 दिवस करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुच्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील सर्व दौ-यांची माहिती वेबसाइटवर प्रकाशित करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment