Saturday 19 November 2016

.लग्न समारंभासाठी 2.50 लाख आणि शेतक-यांस 50 हजाराच्या घोषणेचे परिपत्रक नाही

लग्न समारंभासाठी 2.50 लाख आणि शेतक-यांस 50 हजाराच्या घोषणेचे परिपत्रक नसल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण असून याबाबतीत आरबीआय ने ताबडतोब परिपत्रक किंवा अधिसूचना काढण्यास आदेश देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की केंद्र शासनाने ज्यांच्या घरात लग्न समारंभ आहेत त्यांस 2.50 लाख आणि शेतक-यांस 50 हजार खात्यातुन काढण्यासाठी घोषणा जरी केली असली तरी बँकेस याबाबतीत कोणतीही सूचना देण्यात आली नाही त्यामुळे बँक कर्मचारी आणि नागरिकांत संभ्रमाचे वातावरण आहे. ही जबाबदारी ज्या आरबीआय अधिका-यांची आहे त्यांच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वानाच बसला असून त्यावर कार्यवाही करत ताबडतोब प्राध्यानाने या प्रकारचे परि
पत्रक काढण्याचे आदेस देण्याची विनंती अनिल गलगली यांची आहे.

No comments:

Post a Comment