Thursday 29 September 2016

कुलगुरुच्या विरोधातील तक्रारीची राज्यपाल सचिवालयाकडे स्वतंत्र नोंदवही नाही

महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठाच्या कुलगुरुच्या विरोधात तक्रारीचे प्रमाण वाढलेले असताना या कुलगुरुच्या विरोधातील तक्रारीची राज्यपाल सचिवालयाकडे स्वतंत्र नोंदवही नसल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या माहितीत राज्यपाल सचिवालयातील शिक्षण विभागाने केला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे राज्यातील सर्व कुलगुरुच्या विरोधात आलेल्या तक्रारी आणि केलेली कारवाईची माहिती मागितली होती. राज्यपाल सचिवालयातील शिक्षण विभागाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी प्र.पां.लुबाळ यांनी अनिल गलगली यांचा अर्ज नाकारत कळविले की अर्ज मोघम स्वरुपाचा असून कोणत्या नेमक्या कुलगुरुविषयी अथवा विशिष्ट तक्रारीबाबत उल्लेख नाही.तसेच या कार्यालयात सर्व कुलगुरुच्या तक्रारीबाबत स्वतंत्र नोंदवही ठेवली जात नाही. लुबाळ यांनी पुढे कळविले की नेमक्या कोणत्या कुलगुरुच्या विरोधा कोणत्या तक्राराची माहिती हवी आहे ती कळविल्यास त्यासंबंधी या कार्यालयात उपलब्ध माहिती पुरविणे शक्य होईल. अनिल गलगली या दाव्याच्या विरोधात राज्यपालाचे उपसचिव परिमल सिंह यांस कडे प्रथम अपील दाखल केले आहे. राज्यपाल हे सर्व विद्यापी
ठाचे कुलसचिव असून राज्यपाल सचिवालयात शिक्षण विभाग असूनही अश्या माहितीची नोंद नाही, ही बाब आश्चर्यजनक आणि पटणारी नसल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त करत अवर सचिव माहिती लपवित असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, नार्थ महाराष्ट्र यूनिवर्सिटी जळगाव, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी, शिवाजी यूनिवर्सिटी कोल्हापूर, सोलापूर यूनिवर्सिटी, मराठवाडा कृषि यूनिवर्सिटी परभणी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन यूनिवर्सिटी नाशिक अशी विद्यापीठ असून कुलगुरुच्या विरोधात असंख्य तक्रारी असतात.

No comments:

Post a Comment