Monday 20 June 2016

शरद पवाराच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाची अशीही फसवाफसवी

महाराष्ट्र विधानसभा सुवर्ण महोत्सव प्रदर्शन 1987-88 मध्ये ठेवण्यासाठी कलामहर्षी पद्मश्री कै.एम.आर. आचरेकर यांचे तैलचित्र घेतले गेले होते जे सद्या शरद पवाराच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या कब्ज्यात असून वारंवार पत्रव्यवहार करुनही महाराष्ट्र विधानमंडळ आणि आचरेकर कुटुंबियांस प्रतिष्ठान दाद देत नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र विधानमंडळाने दिली आहे. प्रतिष्ठानाकडे कोणतीही कागदपत्री मालकी नसतानाही तैलचित्र परत देण्यासाठी सुरु असलेली फसवाफसवी पहाता तैलचित्र विधानमंडळातून प्रतिष्ठानाकडे कसे गेले, याबाबत वेगवेगळी चर्चा सद्या विधानमंडळ परिसरात सुरु आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात शरद पवार यांच्या एनसीपी पक्षाचे कार्यक्रम आणि अन्य सामाजिक उपक्रम होत असतात आणि एनसीपीचे शक्तीस्थान म्हणून ओळखले जाते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र विधानमंडळ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाकडे पद्मश्री आचरेकर यांच्या तैलचित्राबाबत माहिती विचारली होती. महाराष्ट्र विधानमंडळाने अनिल गलगली यांस त्यांच्या अभिलेखावरील कागदपत्राची प्रत दिली. 31 ऑगस्ट 1988 रोजी महाराष्ट्र विधानमंडळाचे ग्रंथपाल अनंत थोरात यांनी आचरेकर कुटुंबियांस पत्र पाठवून महाराष्ट्र विधानसभा सुवर्ण महोत्सव प्रदर्शन 1987-88 मध्ये ठेवण्यासाठी कलामहर्षी पद्मश्री कै.एम.आर. आचरेकर यांच्या तैलचित्राची मागणी करत प्रदर्शन संपताच तैलचित्र परत देणे आणि नेण्या- आणण्याची व्यवस्था सचिवालयातर्फे करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात तैलचित्र आचरेकर कुटुंबियांस देण्याऐवजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या दुस-या मजल्यावर पूर्वेकडील बाजुस भिंतीवर लावलेले आढळले. आचरेकर कुटुंबियांने तैलचित्रासाठी महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे दरवाजे ठोठावल्यानंतरही प्रतिष्ठान झुकले नाही तर उलट आचरेकर कुटुंबियांकडे वारसा हक्क प्रमाणपत्र, नुकसान भरपाई हमीपत्र आणि विशेष मुखत्यारपत्र सहित तैलचित्राचे खरे मालक व त्या वारसाचे प्रमाणपत्र मागत प्रकरणास वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने प्रतिष्ठानास पत्रव्यवहार वारंवार केला असून पॉवरफुल प्रतिष्ठानाच्या सरळ जाब विचारण्यास धजावत नाही. अनिल गलगली यांच्या मते पद्मश्री असलेल्या आचरेकरांचे ऐतिहासिक तैलचित्र घेणारी महाराष्ट्र विधानमंडळाने प्रतिष्ठानाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे कारण जे तैलचित्र महाराष्ट्र विधानमंडळाने प्रदर्शनासाठी मागविले होते ते प्रतिष्ठानात कसे गेले? याची गंभीर दखल घेतली नसल्यामुळे प्रतिष्ठान आचरेकर कुटुंबियांस ख-या मालकाचा पुरावा मागण्याचा अतिशाहणपण करत आहे. महाराष्ट्र विधानमंडळासोबत झालेला कोणताही पत्रव्यवहार सद्या तरी प्रतिष्ठानाकडे नसल्यामुळे तैलचित्र प्रतिष्ठानाने लंपास केल्याची शंका व्यक्त करत यामुळे महाराष्ट्र विधानमंडळाची प्रतिष्ठा ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या नकारात्मक भूमिकेमुळे वादात अडकलेली आहे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे. अनिल गलगली यांच्या अर्जास प्रतिसाद देताना प्रतिष्ठानाचे जन माहिती अधिकारी आणि प्रतिष्ठानाचे सरचिटणीस श.गं.काळे यांनी आवश्यक शुल्क अदा करण्याचे कळविताना जाणूनबुजून शुल्काची रक्कम सांगितली नाही. अनिल गलगली यांनी पत्र पाठवून शुल्काची रक्कम विचारताच काळे यांनी शुल्क कळविण्याऐवजी सदर माहिती त्रयस्थ व्यक्तीशी संबंधित असल्याचा नवा दावा करत महाराष्ट्र विधानमंडळ आणि आचरेकर कुटुंबियांस पत्र पाठविले आहे. काळे यांस प्रतिष्ठानाने कोणती गुणवत्ता आणि अनुभव पहाता जन माहिती अधिकार या पदाची जबाबदारी दिली आहे असा प्रश्न गलगली यांस पडला आहे कारण एकाच अर्जास वेगवेगळी उत्तरे देऊन काळे प्रतिष्ठानास गोत्यात आणत आहे.

No comments:

Post a Comment