Friday 6 May 2016

पालिकेच्या नवीन कामाच्या कंत्राटाची चौकशी करावी, लोक आयुक्तांकडे मागणी

मुंबई महानगरपालिकेने रस्ते कामात झालेला भ्रष्टाचार आणि सावळा गोंधळ लक्षात घेता चौकशी करत 6 कंत्राटदारावर गुन्हे दाखल केले. ही वस्तुस्थिती असताना ज्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाले त्यापैकी आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट आणि जे कुमार यांस हँकॉकसह यारी रोड, मिठी नदी आणि विक्रोळी उड्डाणपूलाचे नवीन कंत्राट बहाल करणे तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या 1300 कोटीच्या कामात पुनश्च कंत्राटदारावर दाखविलेली मेहरबानीची चौकशी करत कार्यवाही करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्याचे लोक आयुक्त एम एल तहलियानी यांच्याकडे केली आहे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्याचे लोक आयुक्त एम एल तहलियानी यांच्याकडे पाठविलेल्या तक्रारीत आश्चर्य व्यक्त केले आहे की एकीकडे ज्या कंत्राटदारावर पालिका गुन्हे दाखल करते त्याच कंत्राटदाराना नवीन काम देते, हा प्रकार विचित्र आहे. त्याचशिवाय गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या 1300 कोटीच्या कामात सुद्धा एफआयआर दाखल झालेल्या कंत्राटदारावर पालिका मेहरबान झाले असून नुकतेच निविदेच्या छाननीअंती त्यापैकीच 2 पात्र ठरले आहेत. एकदा पालिका फसली असून त्यामुळे मोठी बदनामी झाली असताना पुनश्च त्याच त्याच कंत्राटदाराना नवनवीन कामे दिली जात असल्यामुळे पालिकेच्या हेतूवर संशय निर्माण होत आहे. अनिल गलगली मागणी केली आहे की सर्व बाबीची दखल घेत महानगरपालिका आयुक्तकडून हँकॉकसह यारी रोड, मिठी नदी आणि विक्रोळी उड्डाणपूल तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या नवीन कामाचा वस्तुस्थितीवर आधारित अहवाल मागवित मुंबईकरांची आणि पालिकेची होणारी फसवणूक थांबवावी तसेच यापूर्वी दाखल गुन्ह्याबाबत सू-मोटो घेत कार्यवाही करावी आणि मुंबई महानगरपालिका अंतर्गत रस्ते कामात गुंतलेले पालिका अधिकारी आणि कंत्राटदारावर कार्यवाही करणे आणि नुकतेच अश्या कंत्राटदाराना नवीन काम देण्याचा सुरु असलेला प्रयत्न पहाता चौकशी करावी.

No comments:

Post a Comment