Monday 2 November 2015

मरीन ड्राइवच्या क्वीन नेकलेस एलईडी दिव्यांचे परिरक्षण कोण करणार- बेस्ट प्रशासन

मरीन ड्राइवच्या क्वीन नेकलेस एलईडी दिवा बसविण्याला घेऊन उद्भविलेला वाद न्यायालयापर्यंत गेला आणि निळ्या ऐवजी पिवळे दिवे बसविण्याचे काम जरी सुरु असले तरी या एलईडी दिवाचे परिरक्षण कोण करणार? याबाबत बेस्ट प्रशासनाने केलेल्या पत्रास उत्तर देण्याऐवजी पालिका प्रशासनाने मौन बाळगल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरुन समोर येत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनास मरीन ड्राइवच्या क्वीन नेकलेस एलईडी दिवाबाबत माहिती विचारत बेस्ट प्रशासनास प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे मागितली होती. बेस्टचे विभागीय अभियंता ( मार्गप्रकाश बांधणी) यांनी अनिल गलगली यांस कळविले की 644 दिवे काढले गेले असून हे दिवे कैनरा,बजाज, कॉम्पटन व फिक्सोलाईट या कंपन्याचे होते. प्रत्येक दिव्यांची प्रचलित किंमत रु 5000/ असून नवीन दिवे कोठल्या कंपनीचे आहेत? याची माहिती बेस्ट प्रशासनास नाही आहे. अनिल गलगली यांस बेस्ट आणि पालिका प्रशासनात झालेल्या पत्रव्यवहार अंतर्गत जी कागदपत्रे देण्यात आली आहेत त्यात बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ जगदीश पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्यास पालिका आयुक्त आणि नोडल अधिकारी टाळाटाळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिनांक 5 मे 2015 रोजी बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ जगदीश पाटील यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांस पाठविलेल्या 2 पानी पत्रात मरीन ड्राइवच्या क्वीन नेकलेस एलईडी दिवाच्या परिरक्षण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत एलईडी दिवा योजना लागू करण्याची प्रक्रिया आणि पद्धत परिभाषित न केल्याची खंत व्यक्त केली आहे. मेसर्स ईईएसएल ने 7 वर्ष वीज बचत करण्याच्या कामगिरीत सातत्य ठेवण्याचे जरी प्रस्तावित केले असले तरी केबल, पोल्स आणि ब्रैकेट्स आदीचे परिरक्षण अद्यापही बेस्टकडे आहे. भविष्यात गैरसमज, गोंधळ, विलंब टाळणे तसेच जबाबदारी शेयर करण्यासाठी स्ट्रीट लाइटिंग सिस्टमसाठी एकानेच तक्रारी घेणे अधिक चांगले होईल त्यासाठी परिरक्षण प्रक्रिया स्पष्टपणे परिभाषित करणे आवश्यक आहे, असे मत बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ जगदीश पाटील यांनी सरतेशेवटी पत्रात व्यक्त केले. नोडल अधिकारी असलेले अतिरिक्त पालिका आयुक्त एसवीआर श्रीनिवास यांस सुद्धा दिनांक 15 जून 2015 रोजी पाटील यांनी पत्र पाठवून विविध समस्याची माहिती देत भविष्यातील योजना आणि एलईडी योजनेबाबत रोडमैपची माहिती मागितली आहे.पण पालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल गलगली यांच्या मते मेसर्स ईईएसएल या कंपनीने फक्त दिवे लावण्यात रुचि घेतली असून सर्व प्रकारचे परिरक्षण आणि नागरिकांच्या तक्रारी कसे सोडविणार आहेत? याबाबत राज्य शासन आणि पालिका प्रशासनाने निणर्य घेणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment